Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता वकील दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

आता वकील दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
, गुरूवार, 14 मे 2020 (10:56 IST)
कोविड-१९ या आजारामुळे लोकांची जगण्याची पद्धतच बदलून गेली आहे आणि याहून कोणीही सुटलेले नाही. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आता सुप्रीम कोर्टने देखील वकिलांना अंगात काळ्या रंगाचा कोट किंवा रोब घालण्याचं बंधन नाही, स्पष्ट केलं आहे. 
 
सुप्रीम कोर्टासमोर युक्तीवाद करणारे वकील केवळ पांढरा शर्ट आणि नेक टाय वापरु शकतील. सुप्रीम कोर्टानं तात्पुरत्या स्वरुपात हा निर्णय जाहीर केला.
 
यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं जाहीर केलेल्या निवेदनमध्ये म्हटलं की, “व्हर्चुअल कोर्ट सिस्टिममध्ये सुनावणीदरम्यान, वकील मंडळी प्लेन पांढरा शर्ट, पांढरी सलवार-कमीज, पांढरी साडी तसेच गळ्याभोवती प्लेन पांढरा नेकबँड वापरु शकतात. वैद्यकीय सल्ल्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज