गोंदियामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना आता त्यांच्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवावे लागणार आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांना जिल्हा परिषदेकडून मिळणाऱ्या सुविधांना मुकावं लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून सर्वानुमते हा निणर्य घेण्यात आला आहे.
जर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आपल्या पाल्यांना झेडपीच्या शाळांमध्ये शिकवले नाही, तर त्यांचे घरभाडे भत्ता आणि इतर सुविधा दिल्या जाणार नाही असं नव्या ठरावात म्हटलं आहे. या नव्या नियमामुळे शिक्षकांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. निवडणूक कामे, मतदार यादी बनवणे इत्यादी कामांतून मुक्त करा, तरच पाल्यांना झेडपीच्या शाळेत घालू अशी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे.