Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 25 March 2025
webdunia

शैलजा हत्याकांड: एका प्रेमवेड्याची घृणास्पद कहाणी, स्वत:च्या प्रेमाचा खून

शैलजा हत्याकांड: एका प्रेमवेड्याची घृणास्पद कहाणी, स्वत:च्या प्रेमाचा खून
असे म्हणतात की सर्वात धोकादायक असतो प्रेमात वेडा आशिक, तो स्वत:तर बुडतोच पण आपल्यासोबत अनेक लोकांनाही घेऊन बुडतो. असेच काही घडले शैलजा हत्याकांड मध्ये. या हायप्रोफाइल मर्डर स्टोरीत सेनेच्या एका अधिकार्‍याने आपल्याच सहकार्‍याच्या पत्नीवर भयंकर दुष्ट कांड रचले.
 
त्याने शैलजाला मिळवण्यासाठी त्याच्या पती मेजर अमित द्विवेदी यांच्यासह मैत्री वाढवली आणि बहाण्याने त्यांच्या घरी येणे सुरू ठेवले.
 
शैलजा एक आकर्षक आणि सुंदर महिला होती. आत्मविश्वासाने भरलेली शैलजा उच्च शिक्षित आणि उदयोन्मुख मॉडेल होती. शैलजाने 'मिसेस इंडिया अर्थ' स्पर्धेत भाग घेतला होता. मिसेस इंडिया अर्थ पंजाब आणि अमृतसर याचे प्रतिनिधित्व केले होते. शैलजाचे मॉडलिंगच्या दुनियेत उंच भरारी घेण्याचे स्वप्न होते. शैलजाच्या स्वप्नांना पंख लागले होते पण स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच ती या वेड्याचा शिकार झाली.
 
शैलजाला मेजर निखिल हांडा याने नागालँड मध्ये आपल्या पोस्टिंग दरम्यान बघितले होते आणि तिला पाहताक्षणी तो तिला मिळवण्याच्या प्रयत्नात होता. तिच्याशी जवळीक साधण्यासाठी त्याने तिच्या पतीशी मैत्री वाढवली. आरोपी मेजर निखिल हांडा यासोबत शैलजाची मैत्री 2015 मध्ये फेसबुकवर झाली होती. तेव्हा आरोपीने ओळख लपवत स्वत:ला व्यवसायी म्हणून प्रस्तुत केले होते. नंतर त्याने त्यांच्या घरी होणार्‍या समारंभात सामील होण्यासाठी तिच्या पतीशी मैत्री केली. चौकशीत हांडाने सांगितले की त्याने तीन महिलांशी फेसबुकच्या माध्यमाने मैत्री केली होती.
 
हळू-हळू शैलजाशी मैत्री करून ते दोघे आपसात बोलू लागले. ही मैत्री एक नवीन नात्यात बदलली आणि दोघांचे विवाहबाह्य संबंध बनले. परंतू एकदा मेजर अमित यांनी शैलजाला हांडासोबत आक्षेपार्ह व्हिडिओ कॉलिंग करत असताना धरले आणि निखिल हांडाला आपल्या बायकोशी लांब राहण्याची चेतावणी देत शैलजाला ही सक्त अंदाजात समजवले.
 
या नंतर मेजर अमित यांची बदली दिल्ली येथे झाली आणि हळू- हळू सर्व काही पूर्वीसारखं होऊ लागलं. परंतू शैलजाच्या प्रेमात कामांध मेजर हांडाने तिला भेटण्यासाठी आजारी असल्याचा बहाणा केला आणि स्वत:ला व आपल्या मुलाला दिल्ली आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती करवून घेतले. कॉल डिटेलप्रमाणे मेजर निखिल हांडाने शैलजा द्विवेदीला सहा महिन्यात तीन हजार वेळा कॉल केले होते.
 
शैलजा नियमित तेथे आपल्या पायाची फिजिओथेरेपी करण्यासाठी येत होती. दिल्लीत मेजर हांडा आणि शैलजा अनेकदा भेटले. या घटनाच्या दिवशी शनिवारी मेजर हांडाने फोनवर शैलजाला हॉस्पिटल भेटण्यासाठी बोलावले. पोलिसांप्रमाणे बहुतेक हांडा शैलजाला ब्लॅकमेल करत होता.
 
शैलजाला तिच्या पतीच्या सर्व्हिस कारने ड्रायवर सकाळी आर्मी हॉस्पिटल सोडून आला आणि दुपारी 1.30 वाजता पुन्हा पोहचला तर माहीत पडले की त्या दिवशी शैलजा उपचारासाठी आलीच नव्हती. ड्रायवरने मेजर अमित यांना फोन केला आणि पोलिसांना सूचित केले. मेजर अमित यांनी मेजर निखिल हांडावर शंका असल्याचे सांगितले.
 
तेवढ्यात पोलिसांना सूचना मिळाली की एका महिलेचं क्षितवक्षत प्रेत कॅन्टोन्मेंट मेट्रो स्टेशनजवळ सापडले आहेत. ही मृत देह शैलजाची होती. नीरदायीपणे तिचा गळा घोटून तिला कारने कुचले गेले होते. चौकशीत मेजर निखिल हांडाच्या मोबाइलची लोकेशन तिच होती. पोलिसांनी सेनेत सूचित करत हांडाला शोधण्यासाठी अनेक ठिकाणी छापे मारले. पोलिसांनी हांडाला मेरठ येथील आर्मी बेस येथून अटक केली.
 
डीसीपी विनय कुमार यांना दिलेल्या वक्तव्यात मेजर हांडाने सांगितले की त्याचं शैलजावर जीवापाड प्रेम होतं आणि तिच्यासोबत विवाह करू इच्छित होतो. त्या दिवशी त्याने शैलजाला भेटायला बोलावले होते आणि अवैध संबंध सुरू ठेवण्यावर जोर दिला होता.
 
मेजर हांडाने सांगितले की शैलजा त्याला कोर्ट मार्शल करण्याची धमकी द्यायची जेव्हा की तो तिच्यासोबत लग्न करू इच्छित होता. जेव्हा शैलजा संबंध ठेवण्यास नकार दिला आणि सैन्य अधिकार्‍यांशी तक्रार करून कोर्ट मार्शल करण्याची धमकी दिली तेव्हा हांडाने आपल्या कारमध्येच तिला गळा चाकूने चिरला.
 
नोकरीत धोक्यात येऊ शकते हे बघून त्याने शैलजाचा खून केला. ही घटना दुर्घटना वाटावी म्हणून त्याने तिच्या देहावरून कार चालवली. नंतर तो साकेत स्थित स्वत:च्या घरी गेला आणि कार धुतली. या दरम्यान त्याने मोबाइल बंद करून व्हाटसअॅप कॉलने आपल्या काका आणि भावाशी संपर्क केला. त्याने भावाला सांगितले की त्याच्या कारखाली जनावर आला होता. त्याकडून 20 हजार रुपये घेत तो मेरठ निघून गेला.
 
पोलिसाने शैलजाचा मोबाइल दिल्लीच्या साकेत स्थित मेजर हांडाच्या घराबाहेर ठेवलेल्या कचरापेटीतून जप्त केला. कॉल डिटेलने दोघांमध्ये खूप वेळ गोष्टी होत असल्याचे कळून आले. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूदेखील हांडाच्या कारमधून जप्त केला गेला. पोलिस एक आणखी चाकूच्या शोधात आहे कारण त्याकडे दोन चाकू असल्याची शंका आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईची तुंबई होते, मुंबई महानगरपालिकेचे काम आहे तरी कुठे ?