राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे अनुभवाने कमी असतानाही त्यांनी इतर नेत्यांविरोधात चांगली लढत दिली, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेजस्वी यादव यांचे तोंडभरून कौतुक केले. अनुभवाने आणि वयाने कमी असतानाही तेजस्वी यादव यांचे हे यश म्हणजे राजकारणात येणाऱ्या नव्या तरूणांना प्रेरणा मिळेल असेच आहे.
तेजस्वी यादवांविरोधात अनेक अनुभवी नेते होते, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह केंद्रातील अर्धा डझनहून अधिक नेते भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाच्या प्रचारासाठी रणांगणात होते. असे असतानाही तेजस्वी यादव यासर्वांविरोधात एकटे लढले आणि त्यांना मिळालेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे असेही पवार म्हणाले.