Publish Date: Thu, 08 Dec 2016 (17:19 IST)
Updated Date: Thu, 08 Dec 2016 (17:26 IST)
मुंबईतील सीएसटी आणि शिवाजी विमानतळ या दोन्हींची नावे बदलली जाणार आहेत. आता या दोघांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ असा होईल. आधीच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस या नावात ”महाराज” या शब्दाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या नामकरणाला राज्य सरकारच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे.