Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री

शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
, मंगळवार, 24 मार्च 2020 (09:34 IST)
भाजपचे उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी चौथ्यांदा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात आयोजित करण्यात आलेला हा शपथविधी अवघ्या काही मिनिटांत पार पडला. राज्यपाल लालजी टंडन यांनी शिवराज सिंह यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दुपारीच शिवराज सिंह चौहान यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली होती. यानंतर आता त्यांचा शपथविधीही पार पडला आहे. 
 
याआधी शिवराज सिंह चौहान यांनी २००५ ते २०१८ या काळात सलग तीनवेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषविले होते. २०१८ मध्ये काही जागांच्या फरकाने भाजपला सत्ता गमवावी लागली होती. या निवडणुकीत भाजपला १०९ तर काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, अपक्ष, सप आणि बसपाच्या आमदारांना आपल्या बाजूने वळवत काँग्रेसने मध्य प्रदेशात सरकार स्थापन केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत उपाहारगृहे उघडी ठेवता येतील पण 'या' काही अटीं आहेत