Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुजराती हार्दिक आता शिवसेनेसोबत

गुजराती हार्दिक आता शिवसेनेसोबत
मुंबई , मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017 (17:17 IST)

मी सदैव शिवसेनेसोबत आहे असे हार्दिक पटेलने स्पष्ट केले.तर मला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नेहमी पटले असून लोकशाही नाहीतर ठोकशाहीने आम्ही काम करणार आहोत असे हार्दिक पटेल याने नमूद केले आहे.

आचारसंहितेचा एक काळ असतो तसा नोटीस पिरेडचाही एक काळ असतो. योग्य वेळी तुम्हाला ते कळेलच असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. सत्तेतून कधी बाहेर पडणार या प्रश्नावर ते बोलत होते.मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पटेल समाज  यांचे  हार्दिक पटेल यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. हार्दिकची बाळासाहेब ठाकरेंना वंदन करण्याची इच्छा होती. म्हणून तो मातोश्रीवर आला असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. न्याय हक्काच्या लढाईत शिवसेना आणि हार्दिक पटेल एकत्र आहेत असेही त्यांनी नमूद केले आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ती १२ अँड्राईड अॅप्लिकेशन्स हटवा, सरकारकडून गुगलला सूचना