Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक ! शाळा बंद करायची म्हणून विद्यार्थ्याने 20 मुलांना दिले कीटकनाशक

धक्कादायक ! शाळा बंद करायची म्हणून विद्यार्थ्याने 20 मुलांना दिले कीटकनाशक
, शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (23:37 IST)
ओडिशामध्ये शाळा बंद करण्यासाठी एका विद्यार्थ्याने सुमारे 20 विद्यार्थ्यांचे प्राण संकटात टाकले. हे प्रकरण पश्चिम ओडिशातील एका उच्च माध्यमिक शाळेचे आहे. बुधवारी दुपारी कामगाव उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना पाणी प्यायल्यानंतर मळमळ आणि उलट्यांचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे.  ही शाळा बारगड जिल्ह्यातील भाटली ब्लॉकमध्ये आहे. यापूर्वी प्रकृती अस्वास्थ्याची तक्रार केलेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांनी खोलीत ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटलीत ठेवलेले पाणी प्यायले.
यानंतर पुढील काही तासांत वसतिगृहात राहणाऱ्या इतर 18 विद्यार्थ्यांनीही मळमळ आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली. हे सर्व 11वीचे विद्यार्थी होते. या सर्व विद्यार्थ्यांनी एकाच बाटलीतून पाणी प्यायले. घाईगडबडीत येथील प्रशासनाने या सर्व विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. या विद्यार्थ्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी या सर्वांना रविवारी दुपारपर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. बारगढचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अरुण कुमार पात्रा यांनी सांगितले की, या सर्व विद्यार्थ्यांनी कीटकनाशक मिसळलेले पाणी प्यायले होते. 
 हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळा व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे. शाळा प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. कला विषयाच्या 16 वर्षीय विद्यार्थ्याने बागेत वापरलेले हे कीटकनाशक पाण्यात मिसळल्याचे तपासात समोर आले आहे. 
शाळेचे प्राचार्य  म्हणाले, “4 डिसेंबरला हा विद्यार्थी त्याच्या घरी गेला होता आणि 6 डिसेंबरला तो पुन्हा वसतिगृहात आला. मात्र या विद्यार्थ्याला पुन्हा घरी जायचे होते. कोरोना विषाणूचे ओमिक्रॉन व्हेरियंट चे वाढते प्रकरण पाहता सरकार लवकरच लॉकडाऊन लागू करेल , अशी आशा त्यांनी व्यक्त केली . जेव्हा त्याने सोशल मीडियावर बघितले की ओमिक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या प्रकरणा मुळे 19 डिसेंबरला लॉकडाऊन होणार आहे, तेव्हा त्याच्या घरी जाण्याची आशा वाढली. 
 यानंतर, जेव्हा मी माझ्या शाळेच्या ग्रुपमध्ये हा मेसेज टाकला की लॉकडाऊनची बाब निव्वळ अफवा आहे, तेव्हा हे समजल्यानंतर विद्यार्थी खूप अस्वस्थ झाला. त्याने त्याच्या काही मित्रांना सांगितले होते की, तो काहीही करून कॉलेज बंद करावणारच.
बुधवारी या विद्यार्थ्याने हे विष पाण्याच्या बाटलीत मिसळले आणि त्यांनी हे विषमिश्रित पाणी या विद्यार्थ्यांना दिले. पाण्याचा रंग बदलल्याचे पाहून काही विद्यार्थ्यांनी ते फेकले, तर काहींनी पाणी प्यायले .
ज्या विद्यार्थ्याने हे कीटकनाशक पाण्यात मिसळले होते, त्या विद्यार्थ्यानेही हे पाणी प्यायल्याने त्याची प्रकृतीही बिघडल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. जेव्हा या विद्यार्थ्याला संभलपूर जिल्ह्यात उपचारासाठी रेफर करण्यात आले तेव्हा तो कोणालाही न सांगता तेथून 48 किमी दूर आपल्या घरी गेला. चौकशी त  या विद्यार्थ्याने शाळा बंद व्हावी यासाठी असे पाऊल उचलल्याचे समोर आले. 
या घटनेनंतर पीडित विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली आणि विद्यार्थ्यावर एफआयआर नोंदवण्याची मागणीही जोर धरू लागली. मात्र मुलाचे भविष्य पाहता त्याला कडक ताकीद देण्यात आली असून त्याला काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तर प्रदेश : कडेवर 3 वर्षांची चिमुकली असतानाही पोलिसाकडून लाठीमार