Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजपासून उघडणार दुकानं, काही अटींसह परवानगी

shops will be open from today with conditions
, शनिवार, 25 एप्रिल 2020 (12:01 IST)
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले असून देशभरातील दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानंतर आजपासून काही अटींसह दुकानं उघडता येतील. दुकानं उघडण्यास जरी परवानगी मिळाली असली तरी मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.
 
गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री काढलेल्या पत्रकानुसार काही अटींवर देशातील सर्व दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. आजपासून हा आदेश लागू झाला असून महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील निवासी भाग आणि परिसरातील दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मद्य विक्रीची दुकानं तसंच मॉल्स सुरू करण्याला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. मद्यविक्रीची दुकानं ही एक्ससाइज कायद्यांतर्गत येतात. त्यामुळे ही दुकानं बंदच राहणार आहेत.
 
दरम्यान हॉटस्पॉट असेलेल्या आणि कॅन्टोनमेंटच्या ठिकाणी मात्र दुकानं उघडी ठेवता येणार नाहीत. सामान्य दुकानांना 50 टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसंच काम करणाऱ्यांना मास्क घालणं तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा