Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Hyderabad: हैदराबादमध्ये श्रद्धा वाल्करसारखे हत्या प्रकरण, दगड कापण्याच्या यंत्राने मृतदेहाचे तुकडे, अटक

hydrabad murder case
, गुरूवार, 25 मे 2023 (17:01 IST)
ANI
दिल्लीतील श्रद्धा वॉकर हत्या प्रकरणासारखीच एक घटना हैदराबादमध्ये समोर आली आहे. पोलिसांनी बुधवारी एका महिलेच्या लिव्ह इन पार्टनरला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. बी चंद्रमोहन (48) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, चंद्रमोहनने अनुराधा रेड्डी (55) यांचा भोसकून खून केला आणि नंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी अनुराधाचे कापलेले डोके कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले होते.
 
दक्षिण पूर्व विभागाचे डीसीपी सीएच रुपेश यांनी मीडियाला सांगितले की, 17 मे रोजी आम्हाला जीएचएमसीच्या एका कर्मचाऱ्याकडून तक्रार आली. त्यांनी सांगितले की, अफझल नगर कम्युनिटी हॉलसमोरील मुशी नदीजवळ थेगलगुडा रस्त्यालगतच्या कचराकुंडीच्या ठिकाणी काळ्या कपड्यात गुंडाळलेले अज्ञात महिलेचे डोके त्यांना आढळले.
 
 त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. आठवडाभरानंतर पोलीस आरोपींपर्यंत पोहोचत या प्रकरणाचा छडा लावला आहे.
हैदराबादमध्ये 17 मे रोजी थिआगलगुडा रोडजवळील कचऱ्याच्या डब्यामध्ये एका महिलेचे डोके पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले आढळले होते. पोलिसांना तात्काळ याची माहिती देण्यात आली. बऱ्याच प्रयत्नानंतर हे महिलेचे असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तपासादरम्यान पोलिसांना महिलेच्या ओळख पटली. अनुराधा रेड्डी असे या महिलेचे नाव असल्याचे समोर आले. आठवड्याभरानंतर पोलिसांनी या प्रकरणात 44 वर्षात बी. चंद्र मोहन याला अटक केली आहे.
 
पोलिसांनी बुधवारी या महिलेच्या लिव्ह इन पार्टनरला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. बी चंद्रमोहन (44) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, चंद्रमोहनने अनुराधा रेड्डी (55) या महिलेचा भोसकून खून केला आणि नंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bank Holidays in Jun 2023 : जूनमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील