Sidhu Moose Wala Funeral Today : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी मुसा येथे करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दुरून त्यांचे चाहते गावात पोहोचले. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
मानसाचे एसएसपी गौरव तोरा यांनी सांगितले की, सिद्धू मुसवाला खून प्रकरणात माझ्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाचा वेगवेगळ्या कोनातून तपास करत आहोत. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कार जप्त केल्या आहेत. आमच्याकडे वेगवेगळ्या लीड आहेत. आरोपींना लवकरच अटक होईल, अशी आशा आहे. या घटनेत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार ग्रुपने सोशल मीडियावर या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. या कोनातूनही आम्ही तपास करत आहोत.