Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता सिक्कीममध्ये भाजपचे १० आमदार

आता सिक्कीममध्ये भाजपचे १० आमदार
, बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (10:12 IST)
सिक्कीममधील प्रमुख पक्ष सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट म्हणजेच एसडीएफच्या 10 आमदारांनी राजधानी दिल्लीत भाजपात प्रवेश केलाय. माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्यासह इतर पाच आमदार सोडता उर्वरित सर्व आमदारांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यासोबतच सिक्कीममध्ये आतापर्यंत खातंही उघडू न शकलेल्या भाजपकडे आता 10 आमदार झाले आहेत. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. एसडीएफकडे आता फक्त पाच आमदार उरले आहेत.
 
यावर्षी झालेल्या निवडणुकीत एसडीएफला पराभवाचा सामना करावा लागला. पण पक्षात 2013 मध्ये बंडखोरी करुन सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाची स्थापना करणारे प्रेम कुमार तमांग उर्फ पीएस गोले यांनी एसडीएफच्या बालेकिल्ल्यावर झेंडा फडकावला. 32 सदस्यसंख्या असलेल्या सिक्कीम विधानसभेत गोले यांच्या पक्षाने 17 जागा मिळवल्या, तर एसडीएफला 15 जागा मिळाल्या. प्रेम तमांग यांनी सत्ता स्थापन केली. सिक्कीममधील एकमेव लोकसभा मतदारसंघावरही सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचाच कब्जा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यसभा निवडणूक, मनमोहन सिंग यांचा राजस्थानमधून अर्ज दाखल