Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sindhu Border Murder Case: सिंघू बॉर्डर हत्या प्रकरणात 2 आरोपींना अटक, इतर 2 जणांनी आत्मसमर्पण केले

Sindhu Border Murder Case: सिंघू बॉर्डर हत्या प्रकरणात 2 आरोपींना अटक, इतर 2 जणांनी आत्मसमर्पण केले
, रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (11:39 IST)
सोनीपत/अमृतसर हरियाणाच्या सोनीपतमध्ये, सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी एका दलित मजुराला मारल्याच्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली, तर इतर दोन आरोपींनी सोनीपत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्याचवेळी, मृतांच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांच्या अमानवीय केलेल्या या कृत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
 
दरम्यान, मृतक लखबीर सिंगचे अंतिम संस्कार कुटुंबीयांच्या उपस्थितीत पंजाबच्या तरण तारन जिल्ह्यातील गावात कडक सुरक्षा व्यवस्थेदरम्यान करण्यात आले . लखबीरच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अंतिम अरदास साठी  तेथे कोणताही ग्रंथी उपस्थितनव्हते, किंवा त्याच्या गावी चीमा कलांमधील कोणीही अंत्यसंस्काराला उपस्थित झाले नाही .
 
हे अमानवीय निर्घृण हत्याकांड घडवल्याबद्दल सरबजीत सिंगला शुक्रवारी अटक करण्यात आली. सरबजीतला आज हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील न्यायालयात हजर करण्यात आले जेथे त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
 
काही तासांनंतर अमृतसर ग्रामीण पोलिसांनी अमृतसर जिल्ह्यातील अमरकोट गावातून दुसरा आरोपी नारायण सिंह याला अटक केली. या निर्घृण खून प्रकरणात, इतर दोन लोकांनी शनिवारी संध्याकाळी उशिरा सोनीपत पोलिसांसमोर कुंडलीमध्ये आत्मसमर्पण केले. दोघेही पंजाबमधील फतेहगड साहिबचे रहिवासी आहेत.
 
अटकेपूर्वी नारायण सिंह यांनी अमरकोट गुरुद्वारामध्ये अरदास केली आणि यावेळी काही लोकांनी त्यांना फुले आणि नोटांचा हार घालून त्यांचा सन्मान केला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरबजीत सिंगने या निर्घृण हत्येत आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचा दावा केला होता. यानंतर, दिल्लीच्या सीमेवरील निषेध स्थळे रिकामी करण्याची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेथे केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.
 
शेतकरी नेत्यांनी मात्र या घटनेचा त्यांच्या आंदोलनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, निषेधाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आणि अधिक स्वयंसेवक तैनात करून सुरक्षा आणखी मजबूत केली जाईल.
 
पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यातील मजूर लखबीर सिंगचा मृतदेह शुक्रवारी सिंगू सीमेवर बॅरिकेड्सला बांधलेला आढळला. त्याचा एक हात कापला गेला होता आणि त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या अनेक खुणा होत्या.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोठा अपघात: भोपाळमध्ये दुर्गा विसर्जनासाठी जाणाऱ्या जमावावर कार ने धडक दिली ,एकाचा मृत्यू