Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केमिकल फॅक्ट्रीमध्ये स्फोट; भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी

AP fire
, गुरूवार, 14 एप्रिल 2022 (09:55 IST)
आंध्र प्रदेशातील एलुरु येथील अक्कीरेड्डीगुडेम येथे बुधवारी रात्री एका रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. नायट्रिक अॅसिड मोनोमिथाइलच्या गळतीनंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी विजयवाडा येथे रेफर करण्यात आले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोरस इंडस्ट्रीच्या युनिट 4 मध्ये रात्री 10 वाजता स्फोट झाला, त्यानंतर मोठी आग लागली. त्यावेळी कारखान्यात सुमारे दीडशे लोक काम करत होते.
 
मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये, गंभीर जखमींना 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ परीक्षेच्या अंतिम निकाल जाहीर; स्वप्नील पाटील राज्यात प्रथम