Publish Date: Sat, 25 Mar 2017 (11:01 IST)
Updated Date: Sat, 25 Mar 2017 (11:03 IST)
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अमेरिकेतील उपचारानंतर काल शुक्रवारी भारतात परतल्या आहेत. सोनिया गांधी या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी 16 मार्च रोजी अमेरिकेला रवाना झाल्या होत्या. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सुद्धा त्यांच्या आईसोबत होते. उपचारानंतर दोघेही भारतात परतले आहे.