नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने आयकर खात्याला दिले आहेत.
या निर्णयाविरोधात गांधी परिवार सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. कारण गांधी कुटुंबीयांचे वकील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका सादर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट कंपनीमध्ये संचालक आहेत. हायकोर्टाकडून मिळालेल्या आदेशानुसार आयकर विभाग आता यंग इंडियातील खात्यांमध्ये झालेल्या कथित अफरातफरीची चौकशी करणार आहे.