Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 20 April 2025
webdunia

आत्म्या सोबत शारीरसबंध महाराजासमोर नग्न बसा

soul
, सोमवार, 6 फेब्रुवारी 2017 (09:23 IST)
पुणे येथी  लोणावळ्यातील महाराजांसमोर नग्नावस्थेत बसल्यानंतर तेथे परीकथेमधील जीन  येतो आणि  त्याच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर पैशांचा पाऊस पडत असल्याची बतावणी करीत एका महिलेला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार थेट पोलिसांपर्यंत पोचला असून सहकारनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे लोक किती अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत. तर हातून प्रकरण गेल्यावर पोलिसांची आठवण येते.महिलेने सामजिक कार्यकर्त्या कडे धाव घेतली आही हा सर्व हिडीस प्रकार उघड झाला आहे. मग पिडीत महिलेने पोलिसात तक्रार केली आहे.
 
रेमंड सॅम्युअल फ्रँकलिन (रा. नांदेड सिटी), शेख झहीर अब्बास (रा. चिंचवड), रेश्मा रामदास पाडळे (रा. चराडे वस्ती, वडगाव धायरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धनकवडीमध्ये राहणा-या एका महिलेने फिर्याद दिली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम ३(१), (२) व अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम (१) (क) (ग) (घ) नुसार गुन्हा दाखल केला आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकार पाकीटमार - उद्धव ठाकरे