गुजरात येथे सार्वजनिक ठिकाणी पान सुपारी पदार्थ खाऊन थुंकल्याप्रकरणी अहमदाबाद महापालिकेने एका व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली आहे. पान सुपारी गुटखा खाऊन सार्वजनीक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी देशात पहिल्यांदाच कारवाई करण्यात आल्याचा दावा अदमदाबाद पालिकेने केलाय. अहमदाबाद पालिकेच्या पूर्व उपनगर भागात राहणाऱ्या महेश कुमार व्यक्तीवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. महेश कुमार हे गुटखा खातात त्यांना रस्त्यावर थुकण्याची सवय आहे, हे महाशय सरदार पटेल मूर्ती रोडजवळ फिरत होते त्यावेळी त्यांनी गुटखा खाल्ला आणि जवळच थुंकले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर अहमदाबाद पालिकेने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवल्या कारणामुळे महेश यांना 100 रुपयांचा दंड आकारला आहे. त्यामुळे आता गुजरात येथे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी थुंकला तर तुम्हला दंड लघेच झाला नाही तरी तुम्हला शोधून तुमच्या कडून हा दंड वसूल केला जाणार आहे.