आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचे सहकारी बिभव कुमार यांनी मारहाण आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. शुक्रवारी पोलिसांनी स्वाती मालीवाल यांचे दंडाधिकाऱ्यांसमोर लेखी जबाब नोंदवले. स्वाती मालीवाल यांनी एफआयआरमध्ये बिभव कुमारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
स्वाती मालीवाल यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांचावर आरोप केले आहे त्या म्हणाल्या मी ड्रॉईंग रूम मध्ये बसले असताना विभव कुमार आत आला आणि माझ्यावर आरडाओरड करू लागला. नंतर शिवीगाळ केली आणि म्हणाला तुम्ही आमचे कसे ऐकू शकत नाही? तुम्हाला काय वाटते, तुच्छ बाई, आम्ही तुम्हाला धडा शिकवू असं म्हणत त्याने स्वाती मालीवाल यांना अनेक वेळा पोटात लाथ मारली. माझी मासिक पाळी सुरु असताना विभव कुमारने मारहाण केली. 7-8 वेळा कानाखाली लगावले.
13 मे रोजी दिल्ली महिला आयोगाच्या माजी प्रमुख स्वाती मालीवाल यांनी एफआर आय मध्ये मुख्यमंत्री निवासस्थानी काय घडले ते नोंद केले आहे.स्वाती म्हणाल्या विभव ने तिला मारहाण केली. तीने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला तेव्हाही बिभव थांबला नाही.स्वातीने सांगितले की, ती सतत मदतीसाठी ओरडत होती पण बिभव थांबला नाही. बिभवने तिच्या छातीवर, पोटावर आणि शरीराच्या खालच्या भागावर लाथा मारल्याचा आरोप आहे. स्वातीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गुरुवारी एफआयआर नोंदवला होता, ज्यामध्ये त्यांनी बिभव कुमारला आरोपी बनवले होते. घटनेच्या वेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. एफआर आय मध्ये अरविंद केजरीवालांचे नाव नमूद केलेले नाही.
अशी प्रतिक्रिया स्वाती मालिवाल यांनी प्रसार माध्यमांना दिली.मला आशा आहे की मला योग्य न्याय मिळत कारवाई केली जाईल. काही दिवस माझ्यासाठी कठीण होते. ज्यांनी मला सहकार्य केले त्यांचे मी आभार मानते.