उत्तर प्रदेशातील संभलमध्ये एका मशिदीच्या फेरसर्वेक्षणावरून झालेल्या वादाला रविवारी हिंसक वळण लागले. पाहणी सुरू असताना जमावाने पोलिसांवर दगडफेक आणि जाळपोळ केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या आणि लाठीचार्ज करावा लागला. या घटनेत 20 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि दोन डझन लोक जखमी झाले आहेत. दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
रविवारी सकाळी संभलचे डीएम डॉ. राजेंद्र पानसिया आणि एसपी कृष्ण कुमार विश्नोई यांच्यासह सर्वेक्षण पथक जामा मशिदीत पोहोचले. न्यायालयाचे आयुक्त रमेश राधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मशिदीच्या आत सर्वेक्षणाचे काम सुरू केले. या सर्वेक्षणाची माहिती स्थानिकांना मिळताच संतप्त मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या संख्येने मशिदीबाहेर जमा झाले.
शाही जामा मशीद प्रकरणात घटनास्थळी मोठा गदारोळ झाला. पाहणीसाठी आलेल्या टीमवर लोकांनी दगडफेक केली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. संतप्त जमावाने परिसर पेटवून दिला.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान परिस्थिती चिघळली आणि हिंसाचार पसरला. परिसरात अनेक वाहने जाळण्यात आली.शाही जामा मशिदीत ज्या मशिदीवर दगडफेकीची घटना घडली त्या मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी सर्वेक्षण पथक पोहोचले होते. जामा मशिदीच्या जवळपास 200 मीटरपर्यंत दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
उत्तर प्रदेशच्या काशी आणि मथुरा नंतर आता संभलची शाही जामा मशीद वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. असा दावा केला जात आहे की या जागेवर श्री हरिहर मंदिर होते जे बाबरने 1529मध्ये पाडून तेथे मशीद बांधली होती. मशिदीत शिवलिंग असल्याचा दावाही केला जात आहे.