Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 3 February 2025
webdunia

भारत-चीन सीमारेषेचा परिसरात भूकंप

भारत-चीन सीमारेषेचा परिसरात भूकंप
भारत-चीन सीमारेषेचा परिसर शनिवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. अमेरिकन भौगोलिक सर्वेक्षण संस्थेच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. पहाटे ४ वाजून १४ मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र भारत-चीन सीमारेषेपासून सर्वात नजीक असलेल्या पासीघाट आणि टेझू या  भारतीय शहरांपासून २४० किलोमीटरच्या परिसरात असल्याचे समजते.

भूगर्भापासून साधारण १० किलोमीटर खोल अंतरावर भूकंप झाला. या भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीची माहिती आतापर्यंत मिळू शकलेली नाही. रॉयटर्सच्या माहितीनुसार, चीनमधील ज्या प्रदेशात भूकंपाचे हादरे बसले आहेत तो परिसर विरळ लोकसंख्येचा आहे. याशिवाय अरूणाचल प्रदेश आणि तिबेटमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणाचा आज निकाल