Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sukama : जवानाने टोकाचे पाऊल उचलत स्वतःला गोळी मारली

death
, मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (11:57 IST)
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात एका जवानाने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने हे असे टोकाचे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही. त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. तो स्वतःच्या आजारामुळे त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. 

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात एका पोलीस हवालदाराने आपल्या सर्व्हिस रायफलने गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे वय25 वर्षे आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास या जवानाने स्वत:वर गोळी झाडून घेतली. गंभीर जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या जवानाने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचा तपास करण्यात येत आहे.

छिंदगड पोलीस ठाण्याच्या आवारात आज रात्री आठच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. अधिका-यांनी सांगितले की, छिंदगढ पोलिस ठाण्यात तैनात जवान नरेंद्र नेगी यांनी स्वतःच्या छातीच्या उजव्या बाजूला  रायफलने गोळी झाडली, त्यानंतर त्यांना तात्काळ सुकमा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तातडीने उपचार मिळाल्याने जवानाचे प्राण वाचले.
 
प्राथमिक माहितीनुसार नरेंद्र नेगी हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्याच्या डोक्याच्या जुन्या दुखापतीवर त्याच्यावर उपचार सुरू होते आणि तो बरा होत नसल्याने तो त्रासला होता. याच कारणावरून शिपायाने हे पाऊल उचलल्याचा संशय आहे. सध्या त्यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले, याचा सखोल तपास सुरू आहे.

Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विराट कोहली जखमी अवस्थेत दिसले