फेब्रुवारी व मार्च या महिन्यातील पौर्णिमेला देखील सुपरमून असणार आहे. या तिन्ही महिन्यातील कमी म्हणजे पृथ्वी-चंद्र अंतर हे १९ फेब्रुवारी रोजी रात्री ०९.२३ वाजता ३ लाख ५६ हजार ८४६ कि.मी. असणार आहे. म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा ‘सुपरमून’ असणार आहे. मंगळवारी म्हणजे शिव जयंती दिवशी १९ फेब्रुवारीला सायंकाळी दिसणारा पौर्णिमेचा चंद्र हा सुपरमून असणार आहे. पुर्व आकाशात सायंकाळी ६:२२ वाजता चंद्र उदय होणार आहे. यावेळेस त्याच्या दक्षिणेला सुमारे दोन अंशांवर सिंह राशीतील प्रमुख तारा ‘मघा’ पहायला मिळणार आहे.
मार्च महिन्यातील २१ रोजी हेच अंतर थोडे वाढुन ३ लाख ६० हजार ७७२ कि.मी. असणार आहे. तर १४ सप्टेंबर २०१९ रोजी वर्षातील सर्वात दूर अंतरावर असताना चंद्र ४ लाख ६ हजार २४८ कि.मी. असेल. सायंकाळी पुर्व आकाशात चंद्र सरासरीपेक्षा चौदा टक्के मोठा दिसणार असुन या वर्षात अंतर कमी असल्याने सुमारे तीस टक्के जास्त प्रकाशित दिसणार आहे. ही खगोलीय घटना साध्या डोळ्यांनी पहायला मिळणार आहे. यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची गरज भासणार नाही.