Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

SC ने म्हटले, कुठलाही कायदा लग्नानंतर महिलेचा धर्म बदलत नाही

SC ने म्हटले, कुठलाही कायदा लग्नानंतर महिलेचा धर्म बदलत नाही
लग्नानंतर पत्नीच्या धर्मांतराबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. “एखाद्या महिलेने दुसऱ्या धर्मातील पुरुषाशी लग्न केलं तर तिचा धर्म बदलणार नाही. अशाप्रकारचा कोणताही कायदा भारतात नाही,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?
 
लग्न झाल्यानंतर महिलेचा धर्म हा तिच्या पतीच्या धर्मात विलीन होतो, आणि तिला पतीच्या धर्माचं पालन करावं लागतं, असं कुठल्याही कायद्यात म्हंटलेलं नाही. असं सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्पष्ट केलंय.
 
एका पारशी महिलेच्या याचिकेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं हा निर्वाळा दिलाय. पारसी महिलेचं लग्न दुस-या धर्मातल्या पुरुषाशी झालं, तर ती महिला पारसी धर्माचं पालन करण्याचे अधिकार गमावते, असं गुजरात हायकोर्टानं 2010 मध्ये म्हंटलं होतं. त्यासाठी कोर्टानं पारंपारिक कायद्याचा दाखला दिला होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एक हजारापेक्षा कमी रकमेची खरेदी डेबिट कार्डवरून महागणार