Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्या बहुमत सिद्ध करा, सुप्रीम कोर्टाचा आदेश

उद्या बहुमत सिद्ध करा, सुप्रीम कोर्टाचा आदेश
, शुक्रवार, 18 मे 2018 (15:52 IST)

कर्नाटक विधानसभेत शनिवारी अर्थात  उद्याच दुपारी 4 वा बहुमत सिद्ध करा, असा थेट आदेश सुप्रीम कोर्टाने भाजप आणि कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. याशिवाय उद्या बहुमत सिद्ध करण्यापूर्वी सर्व आमदारांचा शपथविधी पूर्ण करा असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले. यावेळी  न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी, भाजपकडून मुकुल रोहतगी आणि राज्यपालांकडून अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी बाजू मांडली.

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागां पैकी 222 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला 104, काँग्रेसला 78, जेडीएस 38 आणि अन्य 2 जागा आहेत. बहुमताचा आकडा 112 इतका आहे. मात्र सध्या भाजपकडे 104 आणि एक अपक्ष असे एकूण 105 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला अजूनही 7 जागा कमी पडत आहेत.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रोनाल्डो, मेसी यांचा शिरच्छेद करण्याची इसिसची धमकी