एविएशन ग्लोबल समिट ही जगातील उड्डाण क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकारची ही पहिलीच परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेची थीम ‘फ्लाइंग फॉर ऑल’ अशी असल्याचे प्रभू यांनी सांगितले. ते म्हणाले, दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संरक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारी ड्रोन पॉलिसी,रोड मॅप फॉर मॅन्युफॅक्चरिंग एअर क्राफ्ट्स, पॉलिसी फॉर वॉटर ड्रोन, उडान, ‘डिजी यात्रा’, नागपूर ग्लोबल हब, स्किलींग,एअर कार्गो पॉलिसी, लॉजिस्टिक पॉलिसी या संदर्भात विस्तृत चर्चा होणार आहे. यातून पुढील नियोजन करण्यात येईल. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे कौतुक करताना त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी थोड्याच कालावधीत उत्कृष्ट काम केले असल्याचे गौरोवोद्गार श्री. प्रभू यांनी काढले.फिक्कीचे संदीप सोमानी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले, पुढील सहा बिलीयन लोकांसाठी फ्लाईट फॉर ऑल या थीम वर आधारित समिट आयोजित करण्यात आली आहे. सन २०२२ पर्यंत तिसऱ्या मोठ्या उड्डायन क्षेत्राचे मानकरी होण्याचा मान देशाला मिळणार आहे. १२०० प्रतिनिधी, ८३ देश ३५ स्टॉल्स या परिषदेत सहभागी झाले आहेत. भारतातील एविएशन इंडस्ट्री २ लाख कोटी आकार असलेला व्यवसाय आहे. टेलीकॉम किंवा रेल्वेच्या बरोबरीने या व्यवसायातील उलाढाल झाली आहे.नागरी उड्डयण सचिव श्री. चौबे म्हणाले, सर्वात जास्त प्रगती करणारे क्षेत्र हे विमान वाहतूक क्षेत्र आहे. या प्रकारची ही पहिलीच परिषद होत आहे. देशात एक हजार नवीन विमानाची भर पडते आहे. १०० नवीन विमानतळ तयार होत आहेत. हवाई चप्पल घालणाऱ्या व्यक्तीलाही विमान प्रवास करता यावा हे ध्येय आहें. संपूर्ण जगासाठी भारत हे विमान वाहतुकीचे केंद्र राहणार आहे. गेल्या काही वर्षात ४.६ टक्के प्रवासी वाहतुक वाढ झाली आहे. सुमारे ६३ लाख लोकांना रोजगार देणारे क्षेत्र आहे.डॉ. ओलिमुयीवा बेनार्ड अलीयु यावेळी म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय एविएशन क्षेत्रातील वाढीचे कौतुक होत आहे. या प्रकारचे समिट घेतल्याने जागतिक स्तरावरील लोकांना एकत्रित चर्चा करणे शक्य झाले आहे. जीडीपी मधे भरीव योगदान देणारे हे क्षेत्र आहे. २०२० पर्यंत विमान वाहतुक क्षेत्राची भारताची स्थिती जागतिक स्तरावर निश्चितच चांगली असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी व्हिजन २०४० चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्यमंत्री सिन्हा यांनी आभार मानले.