Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंदिरासमोर भीक मागत होता रुसी पर्यटक, स्वराज यांनी अशी केली मदत

मंदिरासमोर भीक मागत होता रुसी पर्यटक, स्वराज यांनी अशी केली मदत
भारत आलेला रुसी पर्यटक इवेंजलिनला तामिळनाडूच्या कांचीपुरममध्ये श्री कुमारकोट्टम मंदिराबाहेर भीक मागण्यासाठी मजबूर व्हावे लागले कारण त्याचा एटिएम पिन लॉक झाला होता ज्यामुळे तो पैसे काढू शकत नव्हता. तसेच मीडिया रिपोर्टचे सज्ञानं घेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी इवेंजलिन यानी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.  
 
सुषमा यांनी मदत करण्याचे दिले आश्वासन
webdunia
सुषमा स्वराजने ट्विट करून म्हटले, 'इवेंजलिन, तुमचे देश रशिया रूस आमचे घनिष्ठ मित्र आहे. चेन्नईत आमचे अधिकारी तुमची पूर्ण मदत करतील.'
 
पिन लॉक झाल्यामुळे काढू नाही शकला पैसे  
 
24 वर्षीय रुसी पर्यटक इवेंजलिन 25 सप्टेंबरला भारतात आला होता आणि मंगळवारी कांचीपुरम पोहोचला होता. काही मंदिर फिरल्यानंतर तो श्री कुमारकोट्टम मंदिराजवळ एका एटिएमवर पैसे काढण्यासाठी गेला.  एटिएम पिन लॉक असल्यामुळे तो पैसे काढू शकला नाही.  
 
भीक मागायचा केला निर्णय  
पोलिसांनी सांगितले की त्याला दुसर काही सुचल नाही म्हणून त्याने मंदिराच्या गेटवर बसून भीक मागण्याचा निर्णय घेतला.  
 
पोलिसांनी दिले पैसे 
स्थानीय लोकांनी पोलिसांना या बाबत सूचना दिली. पोलिस मंदिरात पोहोचली आणि त्याला स्टेशनावर घेऊन गेली. इवेंजलिनचे सर्व दस्तावेज बारकाईने तपासणी केल्यानंतर पोलिसांनी या रुसी पर्यटकाला काही पैसे देऊन चेन्नई जाण्याचा सल्ला दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

37 वर्षांची महिला 38 मुलांची आई