Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ताज हॉटेलच्या 19 व्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाची आत्महत्या

ताज हॉटेलच्या 19 व्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाची आत्महत्या
, मंगळवार, 4 एप्रिल 2017 (12:10 IST)
मुंबईत वांद्र्यातील ताज हॉटेलमधून उडी घेत एका तरुणानं आत्महत्या केली आहे. ताज हॉटेलच्या 19 व्या मजल्यावरुन उडी घेत तरुणानं आपलं आयुष्य संपवलं आहे. अर्जून भारद्वाज असं या तरुणाचं नाव आहे. 24 वर्षीय अर्जून भारद्वाजनं आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओही काढला. ताज हॉटेलमधील त्याच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने आपण ड्रग अडिक्ट असून आपल्याला जगण्याचा कंटाळा आला आहे. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. अर्जून मुंबईतील प्रसिद्ध एनएम कॉलेजचा विद्यार्थी होता. अर्जूनचे वडिल बंगळुरुतील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत.अर्जूनच्या शवविच्छेदनात त्यानं मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचं सेवन केल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशभरात रामनवमीचा उत्साह