तोंडी तलाक देण्याचा मुद्दा हा हिंदू-मुस्लिम मुद्दा नसून विकासाचा मुद्दा आहे त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण न करण्याचं आवाहनही मोदींनी केलं आहे. तर मुस्लिम समाजातील तीन वेळा तोंडी तलाक देण्याच्या प्रथेबाबत राजकारण करू नये. भारतातील मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि त्यांना हक्क मिळवून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
बुंदेलखंडच्या महोबा जिल्ह्यात एका रॅलीमध्ये त्यांनी तोंडी तलाक देण्याच्या पद्धतीवर त्यांनी भाष्य केलं आहे. आपला देश विकास करत असून सपूर्ण जनता यात सामील असली पाहिजे मात्र असे करताना एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा नियम असे होणार नाही आपला देशात अन्याय कोणावरही असो तो दूर झालाच पाहिजे त्यात धर्म महत्वाचा नाही असे परखड मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.