Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिकीट असूनही टीसीकडून मारहाण Video Viral

तिकीट असूनही टीसीकडून मारहाण Video Viral
, शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (13:21 IST)
रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना आगाऊ तिकीट काढावे लागणार आहे. मात्र रेल्वेने प्रवास करताना अनेकदा प्रवासी तिकीट न काढता प्रवास करताना आढळतात. रेल्वेतील तिकीट निरीक्षक (TC) अशा प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करतात. मात्र तिकीट असूनही एका टीसीने प्रवाशाला मारहाण केली.
 
चालत्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाला टीसीकडून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ ट्रेन क्रमांक (15203) बरौनी-लखनऊ एनई एक्सप्रेसचा आहे.
 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक टीसी ट्रेनमध्ये एका प्रवाशाला मारहाण करताना दिसत आहे. संबंधित युजरने या पोस्टमध्ये बरैनी-लखनऊ एक्स्प्रेसची ही घटना असल्याचे म्हटले आहे. माझी काय चूक, माझ्याकडे तिकीट नसते तर मी समजलं असतं, असे हा प्रवासी म्हणताना दिसत आहे.
 
तुम्ही याला का मारता असा सवालही काही प्रवासी करत आहेत. पण तो थांबत नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत टीसीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित ईशान्य रेल्वे विभागाने प्रकाश नावाच्या या टीसीवर कारवाई करून त्याला निलंबित केले आहे.
 
स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करताना माननीय मंत्री @AshwiniVaishnaw जी कृपया या प्रकरणाची दखल घ्या आणि या TC वर कठोर कारवाई करा असे लिहिले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेकोटीमुळे आग लागून 2 भावांचा दुदैवी मृत्यू