नोएडा शहरातील सेक्टर-8 मध्ये असलेल्या झुग्गीनुमा घरामध्ये आज सकाळी पहाटे 4 वाजता भीषण अग्निकांड झाले. या अपघातामध्ये तीन लहान मुलींचं जळून मृत्यू झाला आहे. तसेच त्यांचे आईवडील गंभीर भाजले गेले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या प्रकृती अस्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुलींचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानीय पोलीस आणि फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहचली. व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यामध्ये 10 वर्षीय आस्था, 7 वर्षीय नैना, आणि 5 वर्षीय आराध्या यांचे मृतदेह बेडवर मिळाले. व त्यांचे आई वडील गंभीररीत्या भाजल्याने बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधिकारींनी सांगितले की, आग लागण्याचे प्राथमिक कारण चार्जिंग वर ठेवलेली बॅटरीमध्ये ब्लास्ट झाल्याचे आहे. काळ रात्री या मुलींच्या वडिलांनी बॅटरी चार्जिंग वर लावली होती. शक्यता शॉर्ट सर्किटमुळे किंवा बॅटरी गरम झाल्यामुळे स्फोट झाला असावा. ज्यामुळे खोलीमध्ये आग लागली. या वेळी सर्व कुटुंब झोपलेले होते. ज्यामुळे ते बाहेर निघू शकले नाही. ज्यामध्ये तीन लहान मुलींचा मृत्यू झाला व आई-वडील गंभीर पाने भाजले गेले.