जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला केला गेला. या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या वर्षातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.
पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाजवळ अवंतीपोरा भागातील गोरीपोरा येथे हा हल्ला झाला. गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात 44 जवान शहीद झाले आहेत.
दहशतवाद्यांनी या भागात आधी हायवेवर उभी असलेल्या गाडीत ठेवलेला आयईडी स्फोट केला. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांच्या वाहनांवर स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी गोळीबार केला. आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. हल्ल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. क्षेत्रात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले असून दक्षिण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.