Pulwama News: दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अरिपाल त्रालमध्ये हल्ला केला असून टेरिटोरियल आर्मीच्या जवानावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात जवान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या लष्कराने गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या टेरिटोरियल आर्मीच्या हा जखमी जवान हा सोफीगुंड खानगुंड येथील रहिवासी आहे. तो उत्तर काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवा बजावत होता आणि सुट्टीवर आपल्या गावी आला होता, असे सांगण्यात येते. तसेच याआधीही दहशतवाद्यांनी घृणास्पद कृत्य केले होते, यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेबाबत लष्कराने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या जवानाच्या पायाला गोळी लागली असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. असे भ्याड कृत्य दहशतवाद्यांनी पहिल्यांदा केलेले नाही. याआधी बुधवारी सकाळी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या चौकीवर दोन ग्रेनेड फेकले आणि त्यातील एका ग्रेनेडचा स्फोट झाला. पण, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरक्षा दल संशयिताचा शोध घेत आहे.
Edited By- Dhanashri Naik