श्रीनगर, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा ग्रेनेड हल्ला केला आहे. रविवारी गजबजलेल्या रविवारच्या बाजारात ग्रेनेड हल्ला झाला. या हल्ल्यात सुमारे सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. तसेच दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी टीआरसीजवळील खचाखच भरलेल्या बाजारपेठेत ग्रेनेड फेकले, ज्यामुळे हल्ल्यानंतर गोंधळ उडाला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.या हल्ल्याशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीश्रीनगरच्या रविवारच्या बाजारात निष्पाप दुकानदारांवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सर्व नागरिकांना शांततेत जगण्याचा अधिकार असून या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.