बिहारच्या गोपालगंजमध्ये एका मुलाचा जन्म झाला आहे, ज्याला तीन हात आणि तीन पाय आहेत. लोकांना या मुलाची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. हे संपूर्ण प्रकरण गोपालगंज जिल्ह्यातील बैकुंठपूर सामुदायिक आरोग्य केंद्राचे आहे. त्याचवेळी लाखो मुलांमध्ये असे एक प्रकरण समोर येत असल्याचे सदर रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या बाळ निरोगी असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
बैकुंठपूर ब्लॉकच्या रेवतीथ गावात राहणाऱ्या राहीन अलीची पत्नी रवीना खातून हिने गुरुवारी या मुलाला जन्म दिला. जन्मलेल्या बाळाला तीन पाय आणि दोन शौच मार्ग होते. तीन मोठ्या पायांसह एक लहानसा पाय असल्याचं देखील काहींच म्हणणे आहे. सध्या या विचित्र मुलाला सदर हॉस्पिटलच्या एसएनसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
बाळाला नवजात शिशु युनिट वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे
रेवतीथ गावात राहणाऱ्या रवीना खातून यांना आज प्रसूती वेदना झाल्याचं सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ बैकुंठपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. येथे या मुलाच्या जन्मानंतर त्याची माहिती संपूर्ण परिसरात आगीसारखी पसरली. प्रत्येकाला या मुलाला एकदा बघायचे होते. काही वेळाने कुटुंबीयांनी मुलाला रुग्णालयात नेले, तेथून डॉक्टरांनी मुलाला सदर रुग्णालयात रेफर केले. येथे बाळाला निओनेटल युनिट वॉर्डमध्ये ठेवून उपचार केले जात आहेत. मुलावर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले की अशी प्रकरणे फार कमी आहेत. सध्या मुलाची काळजी घेतली जात आहे. रेवथीथ गावातील रहिन अली यांना तीन मुले आहेत, दोन मुलांपैकी तो सर्वात लहान मुलगा आहे.