Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भ्रष्टाचारी राज्यांच्या यादीत महाराष्ट्र चौथा

भ्रष्टाचारी राज्यांच्या यादीत  महाराष्ट्र चौथा
, शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (12:47 IST)

देशातील भ्रष्टाचारी राज्यांच्या यादीत कर्नाटक अव्वल तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. ‘द सेंटर फॉर मीडिया स्टडीज सर्व्हे’ या सामाजिक संस्थेच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यादीत कर्नाटकपाठोपाठ आंध्र प्रदेशचा दुसरा, तामिळनाडूचा तिसरा, महाराष्ट्राचा चौथा तर जम्मू काश्मीर पाचवा तर पंजाबचा सहावा क्रमांक आहे.

एकूण 20 राज्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये शहर आणि ग्रामीण भागातील 300 जणांचं मत नोंदवण्यात आलं. त्यापैकी हिमाचल प्रदेश, केरळ आणि छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण तुलनेने कमी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गंभीरचा आदर्श : सुकमा हल्ल्यातील 25 शहीदांच्या मुलांचा खर्च उचलणार