रेल्वे, बस सुरू करायलाआणि दुकाने, कार्यालये उघडायला केंद्र सरकारची हरकत नाही केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्यापुढच्या टप्प्यातले दिशानिर्देश जाहीर केले आहेत. त्यानुसार दुकानं, कार्यालयंउघडायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र एका दुकानात केवळ ५ व्यक्तींनाप्रवेश करता येईल आणि ग्राहकांमध्ये किमान ६ फुटाचं अंतर ठेवावं लागेल.
कार्यालय सुरु करण्याची परवानगी दिली असली तरी घरुनच काम करायला प्राधान्य देण्याचं आवाहनकरण्यात आलं आहे. कार्यालयात येणे गरजेचे असल्यास नियमित कार्यालयीन वेळांच्याशिवाय इतर वेळांचा विचार करण्याचे आवाहन देण्यात आले आहे. कार्यालयात थर्मल स्कॅनिंग, हात धुण्याची सुविधाआणि सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे लागेल. तसेच कार्यालयांचे वारंवार निर्जंतुकीकरणआवश्यक असेल. कार्यालयात काम करताना सर्वांना परस्परांपासून अंतर ठेवून वागावेलागेल. याशिवाय सर्वसामान्यांना घरातून बाहेर पडल्यावर चेहरा झाकणे, रुमाल लावणे किंवा मास्क लावणे बंधनकारक आहे.
उघड्यावर थुंकण्यास मनाईकरण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, गुटखा, तंबाखू इ. पदार्थ खाता येणार नाहीत. लग्न समारंभात जास्तीत जास्त ५० लोकांना बोलवता येईल आणि त्यातही लोकांनासोशल डिस्टसिंगचे पालन करावे लागेल. अंत्यसंस्काराला जास्तीत जास्त २० लोक जमू शकतील आणि त्यातही सोशल डिस्टंसिंग आवश्यक असेल.
मंदिर, मशीद, चर्च आणिइतर सर्व धार्मिक स्थळं या काळात बंदच राहतील. शाळा, महाविद्यालय, हॉटेल, चित्रपटगृह, मॉल, व्यायामशाळा, तरण तलाव, बंदच राहणार आहेत. सर्व सामाजिक,राजकीय, धार्मिक कार्यक्रम बंदच राहणार आहे. क्रिडागृह आणि स्टेडियम सुरु करायला परवानगी दिली आहे, मात्र तिथे प्रेक्षकांना परवानगी नसेल.
मेट्रो, विमान वाहतूकसेवा बंदच राहणार आहे. केवळ विशेष परवानगीनेच या सेवा सुरू राहू शकतील. मात्र रेल्वे आणि बस सेवा बंद ठेवण्याविषयी केंद्र सरकारने काहीही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे ही सेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यांना परस्परसहमतीने नागरिकांची वाहतूक करता येईल. याशिवाय राज्यांची इच्छा असेल तर राज्यांतर्गत वाहतूक सुरू करता येऊ शकेल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
राज्यांना आता ग्रीन,रेड आणि ऑरेंज झोन जाहीर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असेल. रात्री ७ ते सकाळी ७ दरम्यान अत्यावश्यकगरजांशिवाय सर्वसामान्य नागरिकांना घरातून बाहेर पडता येणार नाही.