Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 9 April 2025
webdunia

मोठी बातमी, तक्रारदार महिलेने आपण माघार घेत असल्याचे केले ट्विट

The complainant tweeted
, शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (16:04 IST)
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप प्रकरणी एक मोठी अपडेट आली असून तक्रारदार महिलेने आपण माघार घेत असल्याचं ट्विट आहे.
 
रेणू शर्मा यांनी ट्विट करत आपण तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते असं म्हटलं आहे. “एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना जे मला ओळखतात तेदेखील चुकीचे आरोप करत असतील तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते,” असं रेणू शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
 
“जर मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का नाही आले? मी जरी मागे हटले तरी, कोणत्याही पक्षाचं नाव न घेताही मला खाली पाडण्यासाठी आणि आता हटवण्यासाठी इतक्या लोकांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होती याचा अभिमान आहे. आता तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहा,” असंही तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जाणून घ्या, कोरोना लसीकरणाची संपूर्ण माहिती