29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये क्रिप्टोकरन्सी विधेयक सादर केलं जाणार आहे. या अधिवेशनात एकूण 26 विधेयकं सादर केली जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी बोलताना जगभरातल्या देशांनी क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.
भारतात क्रिप्टोकरन्सी लाँच करण्यासाठी आरबीआयने तयारी सुरू केली असून संसदेत मांडण्यात येणाऱ्या विधेयकाद्वारे क्रिप्टोकरन्सीतली गुंतवणूक, डेव्हलपर, मायनिंग याविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचं म्हटलंय.