Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्ली महाराष्ट्र सदनाला आग लागली,अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले

दिल्ली महाराष्ट्र सदनाला आग लागली,अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले
, सोमवार, 26 जुलै 2021 (11:11 IST)
राजधानी दिल्लीत सोमवारी सकाळी महाराष्ट्र सदना मध्ये भीषण आग लागली.आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.या आगीत कुठल्याही जीवितहानीची खबर नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार,सोमवारी पहाटे उठलेल्या ज्वाळांना पाहून महाराष्ट्र सदनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली.अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाचे कूलिंग करण्याचे काम अद्याप सुरू आहे.आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
 
नवीन एनओसी मिळे पर्यंत आगीच्या घटनेत इमारती वापरण्यास परवानगी नाही
दिल्ली फायर सर्व्हिसने गेल्या महिन्यात जारी केलेल्या आदेशानुसार नुकत्याच आग लागलेल्या अशा इमारतींच्या वापरावर बंदी घातली आहे, ज्यात अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आहे,परंतु त्यांना नवीन ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी).) जारी केले गेले नाही.अशा काही आस्थापनांमध्ये अग्निशामक विभागाने अग्निसुरक्षा उपकरणे योग्य प्रकारे काम करत नसल्याचे आढळून आल्यानंतर हे पाऊल उचलले गेले. या आस्थापनांमध्ये रुग्णालये आणि उत्पादन घटकांचा समावेश आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध पहिला टी- 20 भारताने सहज जिंकला, कर्णधार शिखर धवनने या खेळाडूंना विजयाचे श्रेय दिले