Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हनीमूनला उशीर झाल्यानं प्रवाशाने पायलटच्या कानशिलात लगावली

हनीमूनला उशीर झाल्यानं प्रवाशाने पायलटच्या कानशिलात लगावली
, मंगळवार, 16 जानेवारी 2024 (12:39 IST)
आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचा वेळ खूप मौल्यवान झाला आहे. प्रत्येकाकडे वेळ कमी आणि काम खूप आहे. अशा परिस्थितीत एखाद्याचा वेळ वाया गेला तर त्याला राग येणं साहजिकच आहे. पण त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे हल्ला करण्याचा अधिकार कोणालाही नाही. रविवारी इंडिगो एअरलाइन्सच्या दिल्ली-गोवा फ्लाइटमधील एका प्रवाशाने वैमानिकावर हल्ला केला जेव्हा तो उड्डाण उशीर झाल्याची घोषणा करत होता. हनिमूनला जाण्यास उशीर होत होता या मुळे प्रवाशाने असे कृत्य केले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पिवळ्या हुडीमध्ये एक संतप्त प्रवासी पायलटच्या दिशेने धावत असून त्याला थप्पड मारताना दिसत आहे. 

व्हिडिओमध्ये एक एअर होस्टेस प्रवाशांना पायलटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. प्रवासी पायलटला कानशिलात मारण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्यक्तीने दावा केला आहे की तो गेल्या 13 तासांपासून फ्लाईटची  वाट बघत होता. आणि फ्लाईट अजून लेट झाल्यामुळे तो चांगलाच संतापला होता. त्याने पायलटच्या कानशिलात लगावली.  व्हिडिओमध्ये दिसत हे की पायलट प्रवाशांसमोर काही घोषणा करत असताना पिवळा हुडी घातलेला एक व्यक्ती मागून येतो आणि त्याला धक्काबुक्की करतो.

यानंतर तो पायलटला म्हणतो,की तुला विमान चालवायचे आहे तर चालव नाहीतर नको चालवू.दार उघड. असं म्हणत तो त्याच्या कानशिलात मारतो. नंतर एक एयरहोस्टेस येते आणि म्हणते आपण असे करू शकत नाही. एक निळी हुडी घातलेला माणूस येतो आणि तो त्या व्यक्तीला शांत करून बसायला सांगतो. जे केले ते चुकीचे आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.    
 
 Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

औद्योगिक गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण ‘महाराष्ट्र’,विशेष लेख