Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

अखेर मान्सूनचा परतीचा प्रवास संपला

The return journey
नवी दिल्ली , गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (12:30 IST)
नैर्ऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास महिनाभरानंतर देशातून पूर्ण झाला आहे. पाठोपाठ ईशान्य मोसमी वार्‍यांचे  आगमन झाले आहे. गेल्या वर्षीदेखील ऑक्टोबरच्या मध्यावर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
 
यावर्षी परतीचा प्रवास लांबला तसेच ईशान्य मोसमी वार्यांचे आगमनदेखील लांबले आहे. या काळात देशभरात सरासरीच्या तुलनेत 7 टक्के अधिक पाऊस पडला आहे. मान्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल 109 टक्के पाऊस झाला असून सर्वाधिक दक्षिण भारतात 129 टक्के पाऊस झाला आहे. तर उत्तर पश्चिम भारतात सरासरीपेक्षा 15 टक्के पाऊस कमी झाला आहे. मान्सूनच्या  परतीच्या प्रवासाला राजस्थानमधून 28 सप्टेंबरपासून सुरुवात झाली होती. तो मध्य प्रदेशापर्यंत माघारी आला होता. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले व ते आंध्र प्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्रातून अरबी समुद्राला मिळाले. 28 सप्टेंबर रोजी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली होती. नेहमी 15 दिवसांत हा प्रवास पूर्ण होत असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

US ELECTION 2020: रिपब्लिकन पक्षाने ट्विटर, फेसबुक आणि गूगलच्या सीईओला फटकारले