उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाचे काम सुरू असताना बांधकाम सुरू असलेल्या दुमजली इमारतीचा लेंटर अचानक खाली कोसळला. ढिगाऱ्याखाली दबलेल्या सहा मजुरांना वाचवण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली अनेक मजूर गाडले गेल्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या 12 जणांना टीमने वाचवले आहे. टीम ढिगारा हटवण्यात व्यस्त आहे. अपघाताच्या वेळी जवळपास अनेक मजूर काम करत होते. त्यामुळे आणखी अनेक मजूर ढिगाऱ्याखाली दबले असल्याची शक्यता स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
या अपघातात अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचा शोध सुरु आहे.
रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाचे काम सुरू असताना हा अपघात झाला. लेंटर कोसळण्याची आवाज अर्धा किलोमीटर पर्यंत ऐकू आली. आवाजामुळे नागरिक घाबरले. स्थनिक लोक घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना छत कोसल्याचे दिसले.
पोलीस आणि मदत कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरु झाले असून आता पर्यंत 6 मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. प्रशासनाने अपघाताच्या कारणांचा तपास सुरु केला आहे. जखमी मजुरांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहे. स्थानिक पोलिस दलासह एसडीआरएफची टीमही घटनास्थळी रवाना झाली आहे.मदत कार्य सुरु झाले आहे.