Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुलवामातील हुतात्मा मेजर विभूती धौंडियाल यांच्या पत्नी यांना लेफ्टनंट होण्याचा मान मिळाला.

पुलवामातील हुतात्मा मेजर विभूती धौंडियाल यांच्या पत्नी यांना  लेफ्टनंट होण्याचा मान मिळाला.
, शनिवार, 29 मे 2021 (18:12 IST)
देहरादून. काश्मिरच्या पुलवामा येथे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या मेजर विभूती धौंडियाल यांची पत्नी नीतीका धौंडियाल भारतीय सैन्य दलाची अधिकारी झाल्या आहे. नितीका धौंडियाल 29 मे रोजी सैन्यात लेफ्टनंट म्हणून अधिकृतपणे दाखल झाल्या.18 फेब्रुवारी 2019 रोजी लष्करी मोहिमे मध्ये शहीद झालेल्या मेजर विभूती धोंडियाळ यांची पत्नी नीतीका धोंडियाल यांनी काही दिवसानंतर सैन्यात भरती होण्याचा विचार केला. यावेळी नीतीका नोएडा मधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होत्या.
 
डिसेंबर 2012 मध्ये अलाहाबाद येथे महिला प्रवेश योजना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ,स्क्रीनिंग टेस्ट, सायकोलॉजिकल टेस्ट, ग्राउंड टेस्ट, इंटरव्ह्यू, मेडिकल टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर. मार्च 2020 मध्ये गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर त्यांनी चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी येथे प्रशिक्षण सुरू केले अकॅडमी येथे झालेल्या पीपिंग सोहळ्यामध्ये निकिताच्या खांद्यांवर तारे लावले गेल्यामुळे निकिताने भारतीय सैन्यात प्रवेश घेतला.
 
यावेळी, उत्तराखंडचे सीएम तीरथसिंग रावत यांनी निकिता यांना अधिकारी होण्याबद्दल अभिनंदन केले आणि सांगितले की पुलवामा हल्ल्यात सर्वोच्च बलिदान असलेल्या शौर्य चक्राने गौरविलेल्या मेजर शहीद विभूती शंकर धोंडियाल यांच्या पत्नी सौ. नीतीकाजी यांचा सैन्यात समावेश होणं न केवळ त्यांच्या शूर पतीसाठी ही खरी श्रद्धांजली आहे, परंतु उत्तराखंडसाठी अभिमानाचा क्षण आहे.
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

COVID-19: व्हिएतनाममध्ये सापडलेल्या कोरोनाचे वेरिएंट चिंता वाढवीत आहे, हवेत खूप जलद पसरतात