उत्तरप्रदेशातील मेरठ मध्ये मेडिकल पोलीस स्टेशन परिसरातमाणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दारू पिऊन मित्रांनी विद्यार्थ्याला केस पकडून बेदम मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत पिस्तुल तोंडात घातली. त्यांच्या गळ्यात पट्टा बांधून निर्जन ठिकाणी नेले. चेहऱ्यावर लघुशंका केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी आशिष मलिक या आरोपीला अटक केली. आरोपीला दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला जामीन मिळाला.
गंगानगर पोलीस स्टेशन परिसरात राहणारा हा तरुण गेल्या वर्षी बारावी उत्तीर्ण झाला होता. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबरच्या रात्री त्यांचा मुलगा त्यांच्या नातेवाईकांकडे गेला होता. परत येत असताना त्याला त्याचा मित्र राजन याला भेटला. त्याला सोबत घेतले.
यानंतर अज्ञातांनी त्यांच्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. ते सर्व मद्यधुंद अवस्थेत होते.
त्यांनी विद्यार्थ्याला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली. त्याच्या गळ्यावर बेल्टने वार केले. त्याच्या तोंडात पिस्तूल ठेवले. ते त्याला जागृती विहारमधील एका निर्जन भागात घेऊन गेले. जीवे मारण्याची धमकी दिली. चेहऱ्यावर लघवी केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार केला. त्यांनी त्याला त्याच अवस्थेत सोडले.
14 नोव्हेंबर रोजी सकाळी पीडित मुलगा घरी पोहोचला तेव्हा त्याने घडलेल्या प्रकारची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यावरून पोलिसांनी 16 नोव्हेंबररोजी आरोपीविरुद्ध दंगल, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि मारहाण या कलमांखाली तक्रार नोंदवली.
वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने 14 नोव्हेंबरला लघवी केल्याची माहिती दिली नव्हती. 19 नोव्हेंबरला तो व्हिडीओ समोर आला तेव्हा त्याला लघवीची माहिती मिळाली. त्यांनी मेडिकलमध्ये माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मलिकला रविवारी अटक करण्यात आली. इतर फरार आरोपी तरुणांच्या शोधात पोलीस छापे टाकत आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.