अण्णा विद्यापीठ बलात्कार प्रकरणी भाजपचे अध्यक्ष अन्नामलाई यांनी स्वतःला चाबकाचे फटके मारून राज्य सरकारचा निषेध केला. अण्णा विद्यापीठातील विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारावरून त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. अन्नामलाई यांनी कोइम्बत्तूर येथील त्यांच्या घराच्या बाहेर स्वतःला चाबकाचे फटके मारत संताप व्यक्त केला.
महिलांच्या सुरक्षेची हमी देण्यास ते असमर्थ असल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
अन्नामलाई यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले.
26 डिसेंबर रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील अण्णा विद्यापीठ परिसरात विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांचाही त्यात समावेश होता. आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात होती. बुधवारी सकाळी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे अण्णा विद्यापीठ परिसरात एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 37 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
सदर घटना पहाटेच्या सुमारास घडली. पीडित मुलगी तिच्या पुरुष मित्रासह जवळच्या चर्च मधून प्रार्थना करून विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये परतताना त्यांना दोघांनी त्यांना एका निर्जनस्थळी थांबवून मित्राला मारहाण करून पीडित मुलीवर बलात्कार केला.
या नंतर कोट्टुपुरम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोन्ही विध्यार्थ्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळतातच वरिष्ठ पोलीस तातडीने घटनस्थळी पोहोचले या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे.