बद्रीनाथ: उत्तराखंडच्या बद्रीनाथ, केदारनाथ धामनंतर आता गंगोत्री आणि यमुनोत्री धामसाठीही नोंदणी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसह देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना चार धाम यात्रेला जाता येणार आहे. चार धाम यात्रेला जाण्यापूर्वी यात्रेकरूंनी नोंदणी करणे अनिवार्य आहे.
नोंदणीशिवाय कोणत्याही यात्रेकरूला चार धामला भेट देण्याची परवानगी दिली जाणार नाही. यात्रेकरू चार धामला जाण्यापूर्वी उत्तराखंड सरकारच्या व्हॉट्सअॅपसह चार पर्यायांद्वारे स्वतःची नोंदणी करू शकतात. पहिल्या टप्प्यात 21फेब्रुवारीपासून केवळ बद्रीनाथ आणि केदारनाथ धामसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, मात्र आता या चारही धामांमध्ये भाविकांना नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत चार धाममध्ये नोंदणी करणाऱ्यांची संख्या 410 928 वर गेली आहे.
बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला, केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिलला उघडतील. गंगोत्री आणि यमुनोत्री तीर्थक्षेत्रे 22 एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उघडतील. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 22 मार्च रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्याची वेळही निश्चित करण्यात आली आहे. गंगोत्री मंदिर समितीचे सचिव सुरेश सेमवाल यांनी सांगितले की, यावेळी अक्षय तृतीया 22 एप्रिललाच येत आहे. दोन दिवसांचा गोंधळ यावेळी होणार नाही. प्रवाशांना आधार कार्ड घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. नोंदणीमध्ये आधार कार्ड क्रमांक देखील टाकावा लागेल. प्रवासी registrationandtouristcare.uk.gov.in या पोर्टलवर नोंदणी करू शकतील. व्हॉट्सअॅप क्रमांक 8394833833 वर नोंदणी करण्याचा पर्याय असेल. 01351364 या टोल फ्री क्रमांकावर टुरिस्टकेअरउत्तराखंड हे मोबाईल अॅप डाउनलोड करूनही नोंदणी करता येईल.