Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ही आहे ‘चांद्रयान-2’च्या उड्डाणाची नवी तारीख

ही आहे ‘चांद्रयान-2’च्या उड्डाणाची नवी तारीख
, शुक्रवार, 19 जुलै 2019 (08:50 IST)
मोठा तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे ‘चांद्रयान-2’चे उड्डाण ‘इस्रो’ला रद्द करावे लागले, मात्र आता हे यान येत्या 22 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी अवकाशात झेपावणार आहे असे इस्रो ने स्पष्ट केले आहे. 15 जुलै रोजी मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी ‘चांद्रयान-2’ अवकाशात प्रक्षेपित होणार होते.  मात्र, क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या निप्पल जॉईंटमधून गळती झाली त्यामुळे  56 मिनिटे आधीच उड्डाण रद्द केले होते. त्यामुळे  22 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात झेपावणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. अखेरच्या क्षणी तांत्रिक बिघाड उदभवल्यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोला महत्वकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेचे उड्डाण रद्द करावे लागले होते. GSLV MK 3 प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये ही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने याचे उड्डाण रद्द करण्यात आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिजवान कासकरला अटक