Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'हा हिंदूंचा अपमान', 'रामायण एक्सप्रेस' रेल्वेतील कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडवरून वादाला सुरूवात

webdunia
मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (12:12 IST)
'देखो देश अपना' या मोहिमेअंतर्गत रेल्वेने सुरू केलेल्या 'रामायण एक्सप्रेस' या रेल्वेतील कर्मचाऱ्यांच्या भगव्या ड्रेस कोडवरून वाद झाला आहे. उज्जैनच्या संतानी याबाबत आक्षेप व्यक्त केला आहे.
रेल्वेतील वेटर्सच्या ड्रेस कोडचा रंग भगवा असल्याने या संतांनी आक्षेप नोंदवला आहे. तसंच यात बदल केला नाही तर 12 डिसेंबर रोजी 'रामायण एक्सप्रेस' दिल्लीत रोखली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. वेटर्सच्या कपड्यांचा रंग भगवा असणं हा हिंदूंचा अपमान आहे असं आक्षेप नोंदवलेल्यांचं म्हणणं आहे.
याप्रकरणाची रेल्वे खात्यानं दखल घेतली असून कर्मचाऱ्यांचा भगव्या रंगाचा ड्रेस कोड बदलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. "रामायण एक्सप्रेसमधील कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड आम्ही बदलत आहोत. आता हे कर्मचारी प्रोफेशनल कपड्यांमध्ये दिसतील. असुविधेसाठी आम्ही खेद व्यक्त करतो." असं रेल्वेनं म्हटलं आहे.
उज्जैन आखाडा परिषदेचे माजी महासचिव अवधेश पुरी यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं. कर्मचाऱ्यांचा गणवेश न बदलल्यास संत मंडळी रुळावर बसून एक्सप्रेस रोखतील 
असा इशारा त्यांनी आपल्या पत्रातून दिला होता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चोर समजून आदिवासी महिलांना पोलिसांची मारहाण