भारतीय हवामानाची माहिती देणाऱ्या संस्थेनं मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच यंदा सरासरीच्या 93 टक्के पाऊस कोसळणार असल्याचंही स्कायमेटनं म्हटलं आहे. गेल्या वर्षीही हवामान विभागाने 97 टक्के पाऊसपडण्याची शक्यता वर्तवली होती. पण फक्त 91 टक्केच पाऊस कोसळला होता. जून ते सप्टेंबर या महिन्यांत 887 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला असून, या अंदाजापैकी 5 टक्के कमी पाऊसही कोसळू शकतो.
स्कायमेटनं 14 मे 2019ला देशातील चार प्रमुख क्षेत्रांचा मान्सून अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जून महिन्यात तसा महाराष्ट्रात पाऊस कोसळण्याची शक्यता कमीच आहे. जुलै महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहणार असल्याचा स्कायमेटने पुनरुच्चार केला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा स्कायमेटचा अंदाज आहे. सरासरीच्या 93 टक्के इतकाच पाऊस पडेल असे या हवामान विभागाने म्हटले आहे.